STORYMIRROR

कुमार भयकथासूर

Others

3  

कुमार भयकथासूर

Others

माझी माय

माझी माय

1 min
183

दिला मला जन्म करून सहन् यातना असहाय ....

अशी आहे माझी ती गरीबाची माय ...


बोटाला धरून शिकवले तिने चालवायला ....

तिच्यामुळे बोबड्या बोलणे लागलो मी बोलायला ....


कधी पडलो आजारी बसली माझ्या उशाशी ....

स्वतःचे जेवण विसरून तेव्हा राहिलास तू उपाशी ....


शाळेतून घरी आल्यावर माझ्या गप्पामध्ये तू रमायची ....

माझे काही चुकले तर तिकडेच समजवायची .....


माझी सर्व गुपित मी तुला सांगायचो .....

आई सोबत माझी घट्ट मैत्रीण तुला मानायचो .....


गेले माझे वय सरत झालो मी जरी मोठा ....

पण आई तुझ्या मायेला कधी नाही पडला तोटा .....


आली संकटे कितीही तरी माझ्या पाठी उभी राही .....

लढण्याचे बळ मला तिच्या पासून मिळत जाई .....


देवापेक्षा सुद्धा आहे मोठे आईचे स्थान .....

ह्या जगात तिच्या शिवाय नाही कोणी महान .....


आईची महानता सांगायला शब्द आहेत अपुरे ....

तिचे उपकार फेडायला सात जन्म नाही पडणार पुरे ....


देवाकडे एकच मागणे भरपूर आयुष्य दे आईला .....

पुढच्या वेळी माझ्या जन्माचा गर्भ दे तिला .....


Rate this content
Log in