पहिला पाऊस
पहिला पाऊस
1 min
372
झुळ झुळणारा वारा मी
रिमझिमणारा पाऊस तु
ओल्या मातीमधे पडणारा थेंब मी
मातीतून उठणारा सुगंध तु
तुझी वाट पाहणारा चातक मी
माझी तहान भागवणारा मेघ तु
मोराच्या फुललेल्या पिसाऱ्यात मी
पिसऱ्याच्या त्या सौन्द्र्यात तु
आकाशात कडाडनाऱ्या विजात मी
त्या विजाच्या प्रकाशात तु
तुझे शेवटचे प्रेम आहे मी
माझ्या हृदयात राहतेस तु
