STORYMIRROR

कुमार भयकथासूर

Drama Tragedy Inspirational

3  

कुमार भयकथासूर

Drama Tragedy Inspirational

आली दिवाळी घरी

आली दिवाळी घरी

1 min
183

आली दिवाळी राहायला माझ्या घरी 

म्हणाली कोणी कोणी काय केले सांग बर परी 


पाहून दिवाळीला मला आनंद झाला खास 

पण काही क्षणासाठी नाही बसला विश्वास 


जेव्हा पाहिले मी सुंदर रूप तिचे जवळून 

मी तर बाई अगदी गेले हुरळून 


केली सुरुवात मी सांगायला तिला सारे 

ती येण्याआधी घरात कसे वाहत होते वारे


बाबांनी आणि दादाने केली सफाई चकाचक

मी मदतीला गेले म्हणाले एका जागी गप बस


आई न बाजारातून फराळाच सामान आणले 

चकली चिवडा शंकरपाळ्या बनवून टाकले 


फराळात करायला केली मी तिला मदत थोडी 

चुकले काही तर आई म्हणाली कधी शिकणार तु ग घोडी


खरेदीला घेऊन गेले जेव्हा बाबा आम्हाला 

म्हणाले जे काही हवे ते घ्या तुम्हाला


ना आई ने घेतली साडी ना बाबाने नवा कुडता 

तुम्ही नाही घेणार विचारता दुकानातून पाय घेतला काढता 


आहेत आमच्या कडे बरीच कपडे आता नको आम्हाला 

अजून काही हवे असेल तर पाहून घ्या तुम्हाला


ऐकून बाबाचे शब्द पाणी डोळ्यात आले 

टाके मारलेले शर्ट घालून काल ऑफिस ला गेले 


समजले दुख आम्हा दोघा झाली आमची जोडी

बाबांना शर्ट आणि आई ला साधी अशी घेतली साडी 


केले आम्ही खरेदीवर नियंत्रण आमच्या 

ज्याने पूर्ण होतील गरजा त्यांच्या 


होते ध्वनी आणि वायू चे प्रदूषण जास्त 

म्हनुन नाही घेतले फटाके आपले दिवे आहेत मस्त


दिवाळी झाली खुश बोलण्याला माझ्या 

डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद सोबत असतील तुझ्या 


हात जोडून मी ठेवले डोके तिच्या पाई 

पाहता वर ती हळू हळू हवेत विरून जाई 


परी परी आई ने दिला मला आवाज 

झोपेतून जागी झाले हे स्वप्न होते का भास 


खरंच आली होती का दिवाळी माझ्या घरी

घुमला कानात आवाज मी आले होते परी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama