उनाड वारा
उनाड वारा
रानमाळात शीळ घालत आला होता एक उनाड वारा
मध्ये सर्व सामावत घाला कोणी तरी त्याला आळा
नाजूक नाजूक फुल झाडे पडली उन्मळून
सांगा ह्याला झाले किती नुकसान लावा ह्याला पळवून
फेर धरत नाचतो आहे वडाच्या झाड भोवती
एक नाही दोन नाही न जाणो किती घेतो गिरकी
वडा ने विचारलो फिरतो आहेस माझ्या भोवती आवडतो का मी तुला
त्यावर वारा हसून बोला मुळापासून उखडून काढायचे आहे मला
अरे वेड्या सोड हा माज मी आहे खुप ताकदवान
माझ्या भक्क्म मुळान मध्ये आहे माझी जान
नाही देणार मला ते उन्मळू कधीच
प्रयन्त करून पहा सांगितले आहे मी आधीच
वाऱ्याने केला प्रयन्त लावून पुरा जोर
पण वड काही हलला नाही ना पडला कमजोर
तुझ्या मुळात तुझी आहे ताकत मानले
त्याचा मुळेच माझे गर्वाचे घर खाली आणले
वाटले होते माझा वेग करेल तुला उध्वस्त
पण एकीचे बळ दाखवून तुम्ही केले मला पस्त
आपले मूळ सुद्धा माणसाने असेच जपावे
जरी आले थोडे दुःख तरी सोसावे
आपले मूळ आपल्याला कधी नाही जाणार सोडून
जसे वडाचे झाले तसेच आपण पण नाही पडणार उन्मळून
मित्र आणि परिवार आहेत मुळे ह्याची देणार मी हमी
त्यांना जपा कारण तेच येणार संकट कामी
अजून काय लिहू नाही समजत
कविता वाचून घेऊ नका हरकत
