STORYMIRROR

कुमार भयकथासूर

Inspirational Others

4  

कुमार भयकथासूर

Inspirational Others

वीरमाता

वीरमाता

1 min
360

तुझी वाट पाहून ओले नयन झाले 

येणार तु माझ्या भेटीला पत्र तुझे आले


गेलास भारत मातेच्या सेवेसाठी तुझ्या आईला सोडून

वाट पाहते आहे मी प्रत्येक दिवस आणि रात्र जोडून


पाहून तुला झाले आता पुरे दोन वर्ष 

येताच तु पुन्हा घरी होईल लेकरा मला हर्ष 


आठवते तुझे बालपण तुझे बोबडे बोलणे 

अलगत पाऊल टाकून तुझे हळू हळू चालणे 


शाळेत जाताना असायचा तुझा कायम नकार

मैदानी खेळासाठी असायचा नेहमी होकार 


मोठेपणीं होणार मी सैनिक ठरवले होते ठाम

वयात येताच ठरवलेल्या स्वप्नसाठी मेहनत घेतली जाम


व्ह्यावे पूर्ण स्वप्न तुझे इच्छा होती मनात 

एकुलता एक मुलगा देशासाठी जातो आहे हे होते ध्यानात 


झाला तु सैनिकी परीक्षेत पास 

रक्षणासाठी सीमेवर नित्यक्त केले तुला खास 


रोज एकच मागणे मागत आहे देवाला 

शत्रुपासून सुरक्षीत ठेव माझ्या बाळाला 


माझ्या भक्तिमधे कदाचित राहिली काही कमी 

तुझ्या रक्षणाची देवाने दिली नाही हमी


तिरंग्यात लपटून आला घरी तु जेव्हा 

माझ्या भावनेचा बांध फुटला तेव्हा 


होते दुख माझा एकुलता एक लेक गेला 

भारत भूमीच्या रक्षणासाठी तो शहीद झाला 


अजून एक असता लेक त्याला पण केले असते भरती

भारतभुमि आहे महान वीरान ची धरती


आज अश्या वीर मातान मुळेच आपल्याला वीर जवान मिळत आहेत 

जे शत्रूच्या छावणीत जाऊन त्याचा मुस्क्या आवळत आहेत


सलाम आहे माझा त्या सर्व वीर माताना 

ज्यानी नाही केला विचार मुलाना सैन्यात भरती करताना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational