पाऊस गीत
पाऊस गीत
1 min
333
नभातुन बरसल्या मुसळधार धारा
पाहून त्यांना बेफाम वाहू लागला वारा
आकाशात विज सुद्धा दाखवत होती अजब खेळ
तिला पाहण्यात निघून गेला माझा वेळ
आजूबाजूची झाडें सुद्धा लागली होती डोलू
शांत कर माझी तहान हे धरती लागली बोलू
तप्त मातीवर पडता थेंब नभातील पाण्याचा
दरवळला सुगंध आणि लागला आवाज येऊ पक्षी गाण्याचा
पावसाने निसर्गात आणले एक चैतन्या नवी
बदलाची ही लाट वाटे सर्वांना हवी हवी
