Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

शिल्पा म. वाघमारे

Horror Fantasy


3  

शिल्पा म. वाघमारे

Horror Fantasy


ती एक किंकाळी

ती एक किंकाळी

1 min 554 1 min 554

*ती एक किंकाळी*

अचानक आली कानी

गर्द काळ्या अवसेच्या

अंधारलेल्या रानी......... १


भयाण मंतरलेली

सरली ती रात

तुफान वादळं उठवणारी

धडधड काळजात........२


किर्र करणारे रातकीडे

नि वटवाघळे फडफडणारी

टिक् टिक् घड्याळाची

त्यावर ठोके वाढवणारी.....३


सोसाट्याचा वारा वेगाने

कवाडांशी झुंजत होता

कर्णकर्कश नाद तयाचा

एकटीला भिववत होता.......४


धस्स झालं काळजात

अन् स्तब्ध झाले क्षणभर

ओढताच वेगाने कुणी

जेव्हा माझा पदर...........५


ह्रदय आणि मती

बंदच पडलीत तत्क्षणी

काय करावे कळेचना

जणू बंध तोडले श्वासांनी.....६


रा.... म म्हटले फक्त नि

झटकन  वळले मागे

किंचाळून मग स्वप्नातून

खडबडून झाले जागे.......७


सावरले सजनाने तेव्हा

मीठीत त्याच्या दडले

जीवातच जीव आला

म्हणे 'काय ग राणी घडले?'...८Rate this content
Log in

More marathi poem from शिल्पा म. वाघमारे

Similar marathi poem from Horror