रातकीडा
रातकीडा
रात्रीच्या झोपेला
घालतो खोडा !
जंगली जीव हा
आहे रातकीडा..
इवलासा जीव
पण आवाज केवढा !
दिसणार नाही
झोप मोडतो तेवढा..
दिवसभर झाडावर
घेतो विश्रांती !
रात्रभर चालले
किर्रर संगीत आरती..
निसर्गाचे हे संगीत
असते रात्रभर !
सारे जंगल डोलते
त्याच्या तालावर