युद्ध
युद्ध
युद्धात पेटलेला साराच गाव माझा
शोधू कुठे मला मी नाहीच ठाव माझा
कोड्यात बोलणारे सारेच दोस्त होते
मैत्रीत आज झाला बाजार भाव माझा
कोणास काय मागू सर्वस्व हारलो मी
अंगार झेलण्याचा झाला सराव माझा
खेळून युद्ध गेले जाळून जीवनाला
फुकटात आज झाला मोठा लिलाव माझा
संसार पेटलेला आयुष्य पेटलेले
पेटून बर्फ झाला आता स्वभाव माझा