गाळून घाम थोडा
गाळून घाम थोडा
बघशील काय मित्रा गाळून घाम थोडा
पाहून घे जरा तू कामात राम थोडा
आयुष्य आपले हे चिंता नको जगाची
पार्टीत हास मित्रा घेऊन जाम थोडा
धावून खूप झाले स्पर्धेत जीवनाच्या
आले स्मशान मोठे घेऊ विराम थोडा
येथे लिलाव होतो दररोज भावनांचा
बाजार गाढवांचा घोड्यास दाम थोडा
जुळणार बंध नाही माझे तुझे कधीही
जाणून मी सखीचा झालो गुलाम थोडा
पंकज कुमार ठोंबरे
