मी मला भेटलो
मी मला भेटलो
*मी मला भेटलो*
सांजवेळी तुझ्याशी किती भांडलो
मौन राहूनही मी किती बोललो
आठवांनी तुझ्या चिंब मी नाहलो
आसवांचा झरा होऊनी वाहलो
कोण होतीस तू श्वास की फास तू
दूर होताच तू मी कसा संपलो
काय माझा गुन्हा सांग ना तू मला
आरशाशी पुन्हा केस मी हारलो
स्वच्छ पाण्यात मी पाहिला चेहरा
हर्ष झाला किती मी मला भेटलो
*पंकजकुमार उत्तम ठोंबरे*
कोंडोली वाशिम
9503717255
