STORYMIRROR

सानिका कदम

Romance Tragedy

3  

सानिका कदम

Romance Tragedy

क्षण एक तो पुरेसा.....

क्षण एक तो पुरेसा.....

1 min
308

क्षण एक तो पुरेसा

आजवर मनातं जपून ठेवलेला

कळत नकळत हा जीव तेव्हा

तुझ्यात होता अडकलेला


क्षण एक तो पुरेसा

तुझ्या मिठीत असतानाचा

मोहक त्या बाहुपाशात

आजवर देह सुखावलेला


क्षण एक तो पुरेसा

हळव्या झालेल्या मनाचा

आठवणींच्या धुक्यात चालताना 

दवात होता भिजलेला


क्षण एक तो पुरेसा

स्पर्शाने तुझ्या बावरलेला

चांदण्या रातीत ही

तोल तेव्हा सावरलेला


क्षण एक तो पुरेसा

शेवटच्या त्या भेटीचा

विसर ही पडला नाही

तो क्षण होता विरहाचा.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance