STORYMIRROR

Manish Raskar

Tragedy

3  

Manish Raskar

Tragedy

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी

1 min
278

ओघळणारे अश्रू नयनातले स्वत:च प्यायलो

तुझ्या नजरेत आनंद पाहण्यासाठी,


मूक राहून सहन केल सगळं

तुझ हसण ऐकण्यासाठी,


तरसत राहिलो चातकासारखा

तू मेघ होऊन बरसण्यासाठी,


काटयांनी कितीदा घायाळ झालो

तुला फुलासारखखं जपण्यासाठी,


जळले घरटे माझे

तुला प्रकाश देण्यासाठी,


प्रत्येक श्वास मरणाशी झगडतोय

तुझी वाट पाहण्यासाठी,


आता मी निरोप घेतोय

अखेरीस तू माझ्याकड़े परतण्यासाठी,


न जाणो का मरणही माझ्यावर रुसलं

मी तुझा रुसवा काढण्यासाठी,


आता मला जगावसं वाटतयं

तुझ्यावर हजारदा मरण्यासाठी...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy