ते दिवस
ते दिवस
1 min
187
काय वेडे होते ते दिवस
ज्यांनी आम्हाला शहाणे केले,
खरं बोलणं तुझं ऐकण्यासाठी
मी किती खोटे बहाणे केले..!
जगण्यात तीच खरी मजा असते
जी प्रेमात होणारी सजा असते..!
'आह' लागते इथं माझ्या काळजाला
तिथं हृदयाला तिच्या झालेली इजा असते..!
इलाज ह्यावर आता इतकाच
तीच हसणं हीच आपली दवा
आणि तीच बोलणं -
हीच आपल्यासाठी दुआ असते..!
आता तशी वाटते- ही बात छोटी
जशी ही चारोळी होते कविता मोठी,
चार ओळींमध्ये तरी कसं लिहावं
कसं चाललयं माझं जगणं,
'तुम जिंदगीभर खुश राहो'
एवढचं आता माझं मागणं..!!
