STORYMIRROR

Manish Raskar

Romance

3  

Manish Raskar

Romance

अशी रात्र चांदण्यांची

अशी रात्र चांदण्यांची

1 min
254

मी वाऱ्याच्या पंखावरती

गीत लिहावे, 

त्यात तू सूर पेरावे ।

प्रीत आपली अशी असावी

अशी रात्र चांदण्यांची

तू रोज पांघरावी ।।

रीत तुझी मलाही जाहली

पावसात तू असे भिजावे, 

सौंदर्य जसे आरशावरून ओघळावे

अशी रात्र चांदण्यांची

तू रोज पांघरावी ।।

तू वात अन् मी

काजव्यासारखे जळावे

ह्रदयाचे स्पंदन

नयनांना कळावे, 

तू माझं आकाश 

अन् मी तुझ्या

क्षितिजावर मावळावे ।

अशी रात्र चांदण्यांची

तू रोज पांघरावी ।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance