प्रेमाची गजल
प्रेमाची गजल
गात राहिलो माझ्या वेदनांचे तराने
ह्या बेदर्द दुनियेसमोर
परि ना जाणिले कोणी,
तरी सुन्या या मैफिलीत माझ्या
भावनांचे सूर - छेडून कोण गेले ?
गुमनाम जगत होतो अंधारल्या घरामध्ये
चंद्राला शोधत होतो हर एक अमावस्येमध्ये
दिसत नव्हते माझेच मला आँसू
कोपऱ्यातल्या दिव्याला हळूच - उजळून कोण गेले ?
गुमराह झालो मी सुनसान नगरात
काफिलाही बहारचा गेला खूप दूर
राहिलो हताश एकटा या वाटेवर
गुलाबी त्या स्पर्शाने मनास - फुलवून कोण गेले ?
बदनाम पूरा झालो मी इश्काच्या मैफिलीत या
साथीला नव्हते मैखान्यात कोणी या
पैमाना राहिला माझा तसाच खाली
नजरेने मदहोशीचे जाम - पाजून कोण गेले ?
लोटले दूर मजला जिंद्गीने
वाटेत मरणानेही सोडले
बेहालसी जिंदगी अशी होती माझी निराळी
तरी तकदीरित माझ्या - नाव कोरुन कोण गेले ?
अजीब अशी माझी होती कहाणी
दिल में आग अन नयनात पाणी
दर्द-ए-दिलाला कविता बनवले
कवितेस माझ्या गझल - बनवून कोण गेले
कवितेस माझ्या गझल - बनवून कोण गेले ?
