अंतरात प्रेमाची भूक "
अंतरात प्रेमाची भूक "
कधीही अंतरात प्रेमाची भूक
सुखाया लागता कळले
कधी आलीच नाही ती घटी
वाटेत तिने मला खुप छळले..!!
किती मुक्काम वादाशी
करावे लागता रडले मी
सदा हिमतीची थाप होती
दिनरात अशी जीवनातही...
सुखाला शोधण्यासाठी
पुजा आराधणा खुप केली
भरला पहाटेला कलश पण
त्या अटही भाग्याने कोसळली..!!
करी बेचैन मजला हा संथ वारा
गारव्याला ही मी मनी गोठविले
तुझा संदेश येण्याकरीता
कधी तप्त उन्हाला ही बोलविले..!!
भोवताली दिसे सुखद सागर
इथे खाडी कधी ओथंबली नाही
लाट फुटता ह्रदयात जागा
कधीच मी भोगली नाही .!!
या मनाची ओढ मोहतसे
कधी ती फाटून फडफडले
काळजात पडले चरेच चरे
अन् मी धाडकन धरेवर पडले..!!
