STORYMIRROR

Sushama Gangulwar

Romance Tragedy

3  

Sushama Gangulwar

Romance Tragedy

पहिले गुलाब

पहिले गुलाब

1 min
192

आज मी कॉलेजच्या गेट समोर 

गुलाबाचे फुल घेऊन उभा होतो 

तुला प्रपोज करीनच म्हणून 

आतुरतेने वाट तुझी पाहत होतो.....


कॉलेजच्या पहिल्या दिवसांपासूनच 

हातात गुलाबाचे फुल घेऊन फिरायचो

पण तुला जर पटलं नाही तर 

मुस्काट फोडशील म्हणून घाबरायचो...


तुला माहित आहे का आज मी 

पूर्ण तयारीत ईथे आलो होतो 

तू हो म्हनंशील किंवा नाही म्हनंशील 

आपण आपल्या मनाची तयारी केलो होतो....


तू ज्या रस्त्यावरून येतेस 

त्या रस्त्यावर टक लावून बसलो होतो 

दिवस ही आता मावळला होता 

गुलाब ही पुर्णतः कोमेजला होता.....


रोज दिसायची ती आज का नाही दिसली 

असा प्रश्न अचानक माझ्या तोंडून गेले 

समोरून -हदय स्पर्शी उत्तर मिळाले 

अरे तुला माहित नाही आजच तिने लग्नं केले.....


कदाचित निर्णय माझे योग्य होते 

पण दिवस मात्र चुकीचे होते 

हातातील पहिलेच गुलाब तुला दिले असते 

तर आज काळजात अश्रू दाटले नसते.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance