दिवानी राहिली नव्हती
दिवानी राहिली नव्हती
या माझ्या या मनाची
वाट कधी चूकली नव्हती
सोडून गेली असली तरीही
प्रित माझी सुटली नव्हती
प्रेमाच्या बाजारामध्ये
तिला मी जिंकल होत
तिच्या खरेदीसाठी
हृदय स्वतःच विकलं होतं
माझ्या प्रेमाची जाणं
तिच्यासाठी सरली होती
काय कोणास ठावूक
कोणाच्या रंगात रंगली होती
कधी जिला देवाकडे
जोडीदार मागितली होती
आज तिचं देवापुढे
जोड्याने गेली होती
तिच्या जाण्याच्या दुःखाने
काळे नभही स्फुंदल होते
जाताना ती एकटीच नव्हे
तर हृदय ही माझं गेले होते
परत येण्याची इजाज़त तिला
आजही मनाने दिली होती
पण आता ती दिवानी
दिवानी राहिली नव्हती

