दिवाना होत गेलो...
दिवाना होत गेलो...
शतदा तुला पाहताना
मन माझे मांडीत गेलो
राधे तुझ्या रूपावर मी
पुष्कळ शब्द सांडीत गेलो
शब्द सुरातील रूप तुझे हे
डोळ्यांमध्ये साठवीत गेलो
राधे तुझ्या स्वरांवर मी
अख्खा मंथन तरंगत गेलो
तुझे हसणे तुझे लाजणे
हृदयात या आठवीत गेलो
राधे तुझ्या या सौंदर्याला
काव्यात माझ्या बांधीत गेलो
तुझ्या भेटी तुझ्या गाठी
जगास या वाटीत गेलो
राधे तुझ्या या प्रेमात मी
दिवाना दिवाना होत गेलो

