तुझ्या भेटीने ...
तुझ्या भेटीने ...
तुझ्या भेटीच्या कल्पनेने
वेडे मन हे गहिवरते
सोबत नसताना सुद्धा
तुझ्याच मागे भिरभिरते
मिलनाने आपल्या या
मन आसमंतात झेपावते
बोलताना नकळत हळूच
स्पर्शूनही तुला येते
नजरा नजरेच्या खेळात
मन घट्ट तुला बांधू पाहते
तुझ्या सौम्य रूपाला
साठवून डोळ्यांत घेते
न बोलता बोलणे कळावे
हास्य तुला विनवित होते
तुला एकू यावे म्हणूनी
मन ही आक्रोश करीत होत
कळेल कधी ना कधीतरी
नेहमी अस स्वप्न रंगवतं
एवलसं मन फक्त नी फक्त
तुझ्यासाठी भिनभिनत

