अनोळखी तू
अनोळखी तू
1 min
288
अनोळखी तू
अनोळखी मी
अनोळखी वाटते ही दुनिया
अनोळखी तारा
अनोळखी वारा
अनोळखी वाटतो हा पसारा
अनोळखी छंद
अनोळखी धुंद
अनोळखी वाटतो हा चांद
अनोळखी काया
अनोळखी माया
अनोळखी वाटते ही किमया
अनोळखी रीत
अनोळखी प्रीत
अनोळखी वाटते हे गीत
अनोळखी आपण असंच केव्हातरी
अनोळखी सांजेला भेटूया
अनोळखी अनोळखी बोलू काही
अन ओळखीचा प्रवास गाठूया
