काळोखात पुन्हा..
काळोखात पुन्हा..
तोच तो क्षण घोंघावतो
तुझ्यात असल्या स्फुर्तीचा
तुच म्हणाली होती रे
पाऊस होणार नाही ना परतीचा
मी म्हणालो नाही गं
भक्त बनेल तुझ्या मुर्तीचा
तुझ्या प्रत्येक वळणावर
आधार बनेल शर्थीचा
कालच काही वर्षांनी
तु मला भेटली
मनात माझ्या आनंदाची
वात पुन्हा पेटली
मी बावरलो
वेडापिसा झालो
तुझ्यासाठी बोलायला
तुझ्याकडे आलो
पण तु तिरकसपणे पाहुन
मला टाळुन गेली
तुला तरी कळले का?
मला कीती जाळुन गेली?
तुझ्याच या छळण्याने
जीव हरवलाय प्रितीचा
तरी काळोखात पुन्हा हुंदका येतो
सजनी तुझ्याच प्रितीचा..
