प्रतीक्षा
प्रतीक्षा


*प्रतीक्षा*
जगाने जाणले आहे
तुला मी चोरले आहे
मिठीचे रेशमी बंधन
हवेसे वाटले आहे
सखी माझ्यात मी नाही
हृदय तू काढले आहे
उषेची ठेवतो आशा
निशेने घेरले आहे
कसे विसरू तुझे हसणे
मनावर कोरले आहे
कशा जुळवू पुन्हा वाटा
नकाशे फाटले आहे
अबोला तोड राणी तू
यमाला रोखले आहे
*पंकजकुमार ठोंबरे*