तुला शोधतो मी
तुला शोधतो मी
*तुला शोधतो मी......*
सुन्या सांजवेळी तुला शोधतो
तुझ्या आठवांची फुले वेचतो
खरा वाटतो भास आता मला
धुक्याच्या कडेला तुला पाहतो
मला साद देतेस तू सारखी
पहाडात हाका तुला मारतो
किती टाळले मी तुला पावसा
तरी आसवांच्या रुपे भेटतो
कसे पेटले गाव माझे तुझे
सखी पावसाळा मला जाळतो
किती फोडले मी सखी आरसे
मला आरसा का असा भांडतो
कशी मंदिराची चढू पायरी
सखी देवता मी तुला मानतो
*पंकजकुमार उत्तम ठोंबरे*
*वाशिम*9503717255

