STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

2  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

तू बनून ये तुफान

तू बनून ये तुफान

1 min
41


कोरले तुझेच बिंब काळजात साजणी

पाहतो तुझेच रूप आरशात साजणी

देवता तुलाच मी खरी मनात मानतो

पूजतो तुलाच फक्त अंतरात साजणी

बंधनात राहणे तुझे मला न आवडे

ये फिरायला दुधाळ चांदण्यात साजणी

दूर दूर धावतेस स्वप्न तू पहाटचे

मी करेन पाठलाग वादळात साजणी

मी युगे युगे तुझीच वाट पाहतो इथे

तू बनून ये तुफान सागरात साजणी

*पंकज कुमार ठोंबरे वाशिम*

9503717255



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance