Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Tragedy

4.6  

Neha Ranalkar

Tragedy

ये पुन्हा नव्याने परतोनी!

ये पुन्हा नव्याने परतोनी!

1 min
256


तु होतीस देव्हा-यातील मंद समईची ज्योत|

मायेचा सागर ,भरलेला करुणेने ओतप्रोत||१


दिव्यापरी मनातील निराशा घालवणारी|

समस्येत योग्यच मार्ग आम्हा दाखविणारी||२


हरघडी आमच्या हितासाठीच झटणारी|

सत्याच्या मार्गावरून ना तरीही हटणारी||३


अपेक्षाही नव्हती केली तु परत फेडीची|

सेवा तुला का नाही आवडली या वेडीची||४


हवी होतीस आम्हा सा-यांनाच आजही|

मुद्दल तर सोड मी फेडू कसे व्याजही?||५


तुला नसली तरी मला तुच हवी जन्मोजन्मी |

पांग तुझे फेडण्या तुझ्याच उदरी जन्मेन मी||६


जननी जन्म भुमिस्य स्वर्गादपि गरीयसी|

माता मातृभुमि ची तुलनाच नसे कशासी||७


 चारवर्ष झाले तरीही स्मृती गर्दी करतात|

आठवणीत तुझ्या डोळे पाण्याने भरतात||८


तुझ्यापरी माया अशी कुणीच करणार नाही|

कन्या असता चार इतकं प्रेम उरणार नाही||९


तु कधी रागावल्याचे जराही आठवत नाही|

स्नेहच तुझा क्षणोक्षणी मज आठवत राही||१०


आई पुन्हा नव्याने तु आंम्हास हवीच आहे|

गात्रे तुझ्या भेटीस आजही व्याकूळली आहे||११


आज आईला जाऊन चार वर्षे झालीत पण तिच्या स्मृतींचा गंध कायमचा मनात दरवळत राहील असा

तिचा कुटुंब वत्सल स्वभाव होता!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy