प्रेम
प्रेम
तो मज बोलला एकदा ,
तुला मी सोडूनी खूप दूर दूर,
निघुनी कायमचा जात आहे l
मीही विचारले मग त्यास,
वीसरशील का रे, तू त्या साऱ्या,
आठवणी ,ती वचन ,ते माझे हसणे l
एक दिवस तूही बसशील एकटा,
आणि ह्या सार्या आठवणी तुला,
घेरूनी, खूप त्रास देऊनी सतावतील l
हो पण तेव्हा, एक गोष्ट मात्र तू,
विसरु नकोस, पुन्हा माझ्याकडे,
परतुनी कधी येऊ नकोस,
परतुनी कधी येऊ नकोस l

