प्रेमपाखरा
प्रेमपाखरा
प्रेमपाखरा सारखे मन माझे
तुझ्या भेटीसाठी आतुरले
तु मात्र असतोस निशब्द
अरे बघ आभाळ कसं भरलय,
मंद मंद वारा, सोबत ह्या शुभ्र गारा
चल लपाछपीचा खेळ मांडू
होऊ बेधुंद या बरसणाऱ्या पावसात
आज तरी मोकळ करू
मनात दडलेल खर वास्तव,
अरे ये असा आमदार झाल्यासारखा
वागू नकोस ? मला आवडेल तुझी साथ द्यायला
तुझ्या डोळ्यात माझे रूप बघायला
हातात हात दे कायमची साथ दे
ही टवटवीत बागेतील फुले बघ अशीच
आपणही फुलवू बाग प्रितीची
मनातील फुलपाखरू रडतंय, तुझ काय अडतंय
किती हायस वाटतय तुझ्या गोड मिठीत
ऊर भरून आला ह्या पहिल्याच भेटीत
चल पाऊस आता थांबला कधीचा
प्रेम पाखरा
तू असाच येत राहाशील ना निशब्द होऊन
तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात
मी फुलराणी होऊन तुझी वाट बघते
