बळी
बळी
1 min
180
रक्तात माणसांच्या भेद करतांना पाहिला मी
माणूसच माणसाचा बळी घेतांना पहिला मी
चमचेगिरी हुजरेगिरी करतात सर्व गोडबोले
एकमेकांचा केसाने गळा कापतांना पहिला मी
दलाल अन् तळवे चटनारांची नाही कमी इथे
आपल्याच पिल्याला बान मारतांना पहिला मी
हे अमृत पाजती तरी करावी लागते परीक्षा इथे
विषही पाजताना विश्र्वास ठेवणारा पहिला मी
