STORYMIRROR

Sanjeev Borkar

Others

3  

Sanjeev Borkar

Others

कोरोना अभंग

कोरोना अभंग

1 min
211

कोरोना कोरोना! जगभर गाजे

रिंग टोन वाजे! फोनमधे


सारे बाळगा रे! कोरोनाची भीती

जीवघेणी नीति! आहे त्याची


करू नका कोणी! हे हस्तांदोलन 

आता तरी भान! असू द्या ना


परदेशातून! आला हा संसर्ग

नमस्कार मार्ग! दिसे आता


कोंबडे बकरे! खा शिजवून

भीती बाळगून! राहू नका


टाळा सारे आता! गर्दीमधे जाणे

एकटेच राहाणे! मनी धरा


लस कोरोनाची! नाहीच निघाली

पंचाईत झाली! साऱ्याचीच


सांगते संजीव! धीर नका सोडू 

मातीमध्ये गाडू! कोरोनाला


Rate this content
Log in