आधार काठी
आधार काठी
1 min
489
नोकरी माझी ही ग्रामविकासाची
दीन दुबळ्या चे आसु पुसण्याची
बेघरांना घरे , बेरोजगारांना काम
अपंगांना आधार काठी होण्याची
आर्थिक, सामाजिक, विकासासोबत
सर्वांचा मानवी निर्देशांक उंचावण्याची
शुद्ध , थंड पाणी प्रत्येक जीवासाठी
स्वच्छता , सुंदर आरोग्य देण्याची
कुटुंबाची आर्थिक उन्नती साधण्याची
प्रत्येकाला 100 दिवस रोजगार देण्याची
महिला ,बालक,पालक, युवक, शिक्षित करून
एक नवा सुसंस्कृत , भारत घडविण्याची