आपलं घर
आपलं घर
तुझ्या माझ्या नात्याला
चल देऊ नवा आकार
चाहुल देतो पावसाळा
चल बांधू आपलं घर
तुझ्या माझ्या प्रेमाची
चढवू एकेक मऊ वीट
दे हातात हात माझ्या
करू नको तू पायपीट
येईल घरी नवा पाहुणा
स्वागताची तयारी करू
चल सात रंग इंद्रधनुचे
संसारी आपल्या भरू...

