STORYMIRROR

Sanjeev Borkar

Romance

3  

Sanjeev Borkar

Romance

प्रेमवेडी

प्रेमवेडी

1 min
320

जादू तुझ्या प्रितीची

पडली पायात बेडी

सख्या मी झाले रे

फक्त तुझीच प्रेमवेडी 


पाहताच मी तुला

भाळले तुझ्यावर 

चंद्रापरी हसणे तुझे

कोरले काळजावर


तुझे गुलाबी शब्द

पडताच माझ्या कानी

रोमारोमात फुलते मी

होण्यास तुझी राणी


सहवास तुझा वाटतो

मज हवा हवासा 

कधी देशील रे वेड्या

मनाला सांग दिलासा


आस आता तुझीच आहे

मला नाही आधार वाडी 

जगेन मी तुझ्याच साठी

सख्या रे मी तुझी प्रेमवेडी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance