STORYMIRROR

UMA PATIL

Romance

4  

UMA PATIL

Romance

तू येशील तेव्हा

तू येशील तेव्हा

1 min
26K


तू येशील तेव्हा, कळू दे

तुझ्या येण्याची चाहूल

सावकाश ये तू, राणी

वाजवू नकोस पाऊल


रिमझिम पाऊस सरींत

रूणूझुणू वाजती पैंजण

नागमोड्या देहाची आस

वेडा होई तुझा साजण


लाल साडी, रेशमी कुंतल

अंगावरून वाहती ओघळ

ओल्याचिंब शरीराने आपण

गीत गाऊ, बोलू मधाळ


मी तुझाच गं राजसा

तूच माझी प्रीतसखी

एकांताच्या सुंदर क्षणी

दोघे होवूयात सुखी


मिसळलो मी तुझ्यात असा

रंग जसा पाण्यात मिसळला

त्याच रंगात रंगू आपण

तुझ्यातच जीव विसावला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance