STORYMIRROR

Sanjeev Borkar

Others

4  

Sanjeev Borkar

Others

एक सत्य

एक सत्य

1 min
260

माणसांच्या अफाट गर्दीत मला

माणूस म्हणून जगण्याची भीती


नऊ महिने गर्भात पिंड वाढल्यावर

स्त्रीला जन्माला घालण्याची भीती


साऱ्या खोट्यांचा जगात वावरतांना

एक सत्य ओठात आणण्याची भीती


हजारो वर्षांची दगड पुजा सोडल्यावर

दगडाचे देव पुन्हा जिवंत होण्याची भीती


 निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला

 वेड्या राजकारणात मत मूल्य बेकामी 

 झाल्याची भीती


जगाच्या बाजारात पाहिले निरखून

दिसे कुठे लोकशाही कुठे ठोकशाही

शेवटी गर्दीत माणसांच्या माणूस

हरवल्याची भीती


साहित्याला गुण द्या
लॉग इन