एक आठवण
एक आठवण
1 min
251
बालवाडीतला तो दिवस..
आज अजूनही आठवते,
बाई नी शिकविलेले गाणे !
तेच मागे मागे रडत रडत
हुंदके देऊन आसू पुसत
पुन्हा पुन्हा म्हणत जाणे
बालवाडीतला पहिला
दिवस अजूनही आठवतो
बाईंनी दिलेला खाऊ
गोल गोल फेर धरून
एकामागे एक पळत
तोंड भरून खात जाऊ
अजूनही आठवते ते
बाईंनी काढलेले चिमटे
बाईंनी गोष्ट शिकविलेली
समजायला येत नव्हते तेंव्हा
पण वाटत होते काही तरी
गंमत स्वतःशीच केलेली
