तुझ्याशी बोलायचे राहून गेले
तुझ्याशी बोलायचे राहून गेले
1 min
256
प्रेम करायचे सोडून असा भांडत राहिलो
नुसतेच हिशेब प्रेमाचे मी मांडत राहिलो
काळजाच्या आतून हाक तुझी होती तरी
उगीचच माझेच शब्द मी कांडत राहिलो
होता तुझा प्रतेक श्वास तो माझ्याच साठी
जोशात माझ्याच फालतू मी लंगडत राहिलो
तुझी मखमली शेज माझ्या उशाशी असतांना
हवेत मी शोधात त्या फुलांच्या हुंदडत राहिलो
करू नको हिशोब माझ्या वागण्याचा कधी
का? माझे मन कुणासाठी मी सांडत राहिलो
अजुन काही बोलायचे तुझ्याशी राहून गेले
शोधात तुझ्या गुढग्यावर आता रांगत राहिलो
