घरकुल
घरकुल
लग्नाच्या शिजनमध्ये कावळ्याचे लग्न झाले, उन्हाळ्याचे चार महिने मजेत त्यांचे गेले.
झाडाच्या सावली मध्ये झोप घेत होते.
सूर्याच्या किरणांपासून बचाव करत होते.
कधी आनंद ,कधी दुःख कधी कधी हसले,कधी रडले, नव्या नवरीचे नऊ दिवस यातच संपले.
अचानक श्रावणाचे सरी आली, आणि नव्या जोडप्याच्या आनंदाची जागा काळजी घेतली.
नव्या संसाराला एक घरकुल असावे,
पावसापाण्याचा त्याच्यात निवांत राहावे.
हीच एक आकृती होती, हेच एक स्वप्न होते.
घरकुलासाठी तेच कामगार तेच कलाकार तेच गवंडी, तेच सुतार होते.
पावसाच्या चिंतेने काड्या जमत करत होते एक घरकुल बनवत तर दुसऱ्या काड्या लावून देत होते.
नव्या घरकुलासाठी त्यांना जागा मिळालीच नाही,
नव्या संसाराचा तो नवा घरकुल होता,
अनुभव कमी पण आत्मविश्वास दांडगा होता.
काम करता करता त्यांना खूप ताप आला.
कावळे दादांचा ताप 100 पर्यंत गेला.
सतत पाच दिवस असेच चालू होते.
कधी रागावून कधी रडून कधी उडून जात होते.
माझ्या माहितीप्रमाणे ते कधी विजयी झालेच नाहीत.
माणसांपेक्षा पक्षांमध्ये जास्तच एकटी असते हे तेव्हा मला कळाले.
