आठवण
आठवण
तुमच्या आठवणीने डोळे पाणावले
तुमच्या जाण्याने सर्वच धास्तावले
आईचे अश्रु मनातल्या तळ्यात गोठावले
तुमच्या जाण्याने तीचे अस्तीवच हिरावले..!
तुमच्या आठवणीने डोळे पाणावले
तुमच्या जाण्याने माझे स्वप्नच जळाले
माझ्या आयुष्याचे गणितच चुकले
तुमच्या कमीचे रांजण रिकामेच राहिले...!!
तुमच्या आठवणीने डोळे पाणावले
भावाने दुःख काळजात ठेवले
लपवून सर्व कामावर निघाले
तुमच्या जाण्याने त्याचे सुख मुकले..!!!
तुमच्या आठवणीने डोळे पाणावले
बहिणीने सर्व संपले असेच भासवले
पोटच्या पोरीत तुम्हालाच बघितले
तुमच्या जाण्याने तीचं माहेरपणं संपले..।!!!!
तुमच्या आठवणीने डोळे पाणावले
पाणावलेले अश्रूत झोपण्या डोळे मिटले
मात्र आठवणीत जागीच राहिले
पोरकेपण कायमचे पाचीवर पुजले...!!!!!
