तू नसताना
तू नसताना
तू नसताना तू असण्याचे भासत असते....!!!!
तू दूर असताना मन सैरभैर धावत असते
आठवणींच्या हिंदोळ्यावर मन झुरत असते
दुनियेच्या गर्दीत नजर तुलाच शोधत असते
तुझ्या श्वासातच माझे हदय गुतंत असते
प्राजक्ताच्या सुगंधागणिक तुझ्या येण्याची चाहूल असते
दरवळ तुझ्या प्रीतीची अंतर्मनी भिडत असते
तू नसताना तू असण्याचे भासत असते....!!!!
चहुकडे माझी नजर तुलाच शोधत असते
तुला बघितल्याचा आनंद गगनात मावत नसते
मन उधाण होवून तुझ्यापासून सुरु आणि तुझ्यावरच संपत असते
तू नसताना तू असण्याचे भासत असते

