प्रश्न अनुत्तरीत ?
प्रश्न अनुत्तरीत ?
1 min
167
मना ठाई विचारी संघर्ष
हदयी भावनिक कल्लोळ
अस्वस्थ अंतर्मुख विवंचणा
प्रश्न अनुत्तरित ?
अनामिक दुःखांचे कवडसे
पापणीवर असरुंचे झरे
डोई पश्चातापाचे हुदंके
प्रश्न अनुत्तरित ?
बंदिस्त घुसमटलेला श्वास
कोदंट अगतिक दुर्बलता
ऊरी पेटलेले काहूर
प्रश्न अनुत्तरित ?
नशीबी दाटल्या नरकयातना
अजीणॅ जाहल्या जखमा
जिव्हारी जडल्या मुर्त्यूसाया
प्रश्न अनुत्तरित ?