STORYMIRROR

Yogesh Nikam

Tragedy

4  

Yogesh Nikam

Tragedy

आई

आई

1 min
256

का सोडून गेली तू आई

एक क्षण असा जात नाही

ज्यात तुझी आठवण नाही

अन अश्रूंच्या धारा पडत जाई...!!


का सोडून गेली तू आई

होती तू आम्हा लेकरांची सावली

या जगात शोधूनही सापडणार नाही 

तुझ्यासारखी मायेची माऊली..!!


का सोडून गेली तू आई

एकटाच रडताना मी

झोपेत माझ्या डोई

हात फिरवून तू जाई..!!


का सोडून गेली तू आई

तुझ्या लेकरांच्या संसाराची

होती तुला खुपच घाई

बघ आता त्यांच्या संसाराची जाई..!!


का सोडून गेली तू आई

तुझी ऊणीव भरवू शकत नाही

कारण तुझ्या मातृत्वाची सर

कुणालाच येणार नाही..!!


का सोडून गेली तू आई

आता काहीच कमी नाही

दारात ऊभी आहे चारचाकी अन दुचाकी 

पण हे बघण्यास तुच नाही

का सोडून गेली तू आई...!!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy