ती
ती
खरचं आज ती खुप गोड दिसत होती
कपाळावर सुंदर चंद्रकोर टिकली फुलत होती
गुलाबी गालावर खळी पडताच तीळही खुलत होती
बदामी टपोरे डोळे नजरेतील तेज दाखवत होती
छोटेसे नाजूक नाक नथीने लखलख चमकत होते..!!
कानातील कुंतले हवेबरोबर मस्ती करत होती
हातातील बांगड्या खणखणीत आनंदाने वाजत होत्या
काळ्याभोर केसांत मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध दरवळत होता
गळ्यातील सोनेरी हार तिच्या सौंदर्यात भर टाकत होता...
मोरपंखी पैठणी निखळ प्रितीचा पिसारा फुलवत होती
गुलाबी नितळ ओठ जणू गुलाब पाकळ्या दिसत होते
नखरे करत तिचं चालणं वाटसरुंना रुबाब दाखवत होते
गोंडस नाक-तोंड मुरडणं रागावणं खुपच भाव खात होतं...
हे सर्व मी फक्त शब्दात व्यक्त करु शकतो हीच खंत???

