STORYMIRROR

Yogesh Nikam

Tragedy

3  

Yogesh Nikam

Tragedy

शेवटची भेट

शेवटची भेट

1 min
403

हात तुझा माझ्या हाती होता घट्ट पकडून सोडू वाटतच नव्हता

खुप काही बोलायचे होते तुला माझ्याशी अन मला तुझ्याशी

डोळ्यामध्ये तुझ्या आसवांचे थेंब थांबतां थांबत नव्हते

गालावरची ओघळ हलकेच मी पुसत होतो

मिठित माझ्या विसावून आठवणींचा महापूर ओसांडून वाहत होता

अधूनमधून येणारा उनाड वारा विरहाचा ईशारा देवून सैरभैर धावत होता

माझे शब्द अडखळून नजर तुझ्याशी बोलत होती

अचानक हातातून हात सुटला मिठी सैल झाली निघालीस तू, भरलेल्या डोळ्यांनी आणि सौम्य हास्याने अन क्षणातच दिसेनासी झाली कायमची.

अजूनही ते आठवून डोळ्याच्या कडा पाणावल्याशिवाय राहत नाही....!!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy