STORYMIRROR

Yogesh Nikam

Others

3  

Yogesh Nikam

Others

तुझ्या

तुझ्या

1 min
233

तुझ्या येण्याची चाहूल शितल लहरीप्रमाणे कानी पडताच त्या वेळेतच आयुष्य व्यतीत करावे वाटते

तुझ्या बरोबर चालताना नकळत होणारा तुझ्या हाताचा स्पर्श कायमचा हवाहवासा वाटते

तुझे नितळ हास्य बघताना मनातील अंतरंग बेधुंद होवून बागडत असल्याचे वाटते....!!!!!


तुझ्या बरोबर घालवलेल्या क्षणांना हदयात साठवून तिथेच थांबवावेसे वाटते

तुझ्या बोलण्यातील मंजुळ स्वर सतत कानात गुणगुणत असल्याचे वाटते

नजरेला तुझ्या नजर भिडता खाली झुकणार्या नजरेला अलगद झेलून घ्यावेसे वाटते....!!!!!!


अबोला धरलेल्या तुझ्या भावनांना बोलके करुन मन मोकळे करावेसे वाटते

कोवळे ऊन्हाचा स्पर्श तुला होताच आयुष्यभर सावली तुझी बनावेसे वाटते

तुझ्या हदयात माझे हदय गुंतवून तुला कायमचे आपले करावेसे वाटते......!!!!!!


तुझ्या स्वप्नांना माझ्या स्वप्नांत रंगवून तुला खुप खुश ठेवावेसे वाटते

आयुष्यालाही कोडे पडावे तुझ्यात ईतके स्वताला सामावून घ्यावेसे वाटते

रेशमी आपुल्या नात्याला रेशमी धाग्यात गुंफून जन्मोजन्मी सोबत रहावेसे वाटते...!!!!!!!


Rate this content
Log in