पुन्हा प्रेम करणार नाही....
पुन्हा प्रेम करणार नाही....
भेट आपली शेवटची
हसून निरोप घेत आहे,
वरून शांत असलो तरी
हृदयातून रडत आहे....
जात आहेस सोडून मला
नाही अडवणार मी तुला,
असशील तिथे तू सुखी रहा
ह्याच माझ्या शुभेच्छा तुला...
निरोप तुला देतांना
अश्रु माझे वाहतील,
काळजाच्या तुकड्यांना
सोबत वाहून नेतील....
त्या वाहणाऱ्या अश्रूंतही
प्रतिबिंब तुझेच असेल,
नीट निरखून पहा त्यांना
प्राण त्यात माझे दिसेल....
आठवण तू ठेवू नकोस
मी कधीच विसरणार नाही,
भेटणे तुझे अशक्य तरी
वाट पाहणे सोडणार नाही...
जातेस पण जातांना एवढे सांगून जाशील का?
भेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील का?
जाता जाता मागे वळून पाहशील का?
प्रत्यक्षात नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील का?
नेहमीच पराभव झाला तरी
हक्क तुझ्यावर सांगणार नाही,
पण तुझी शप्पथ सांगतो
*पुन्हा प्रेम करणार नाही...*
