भेट तुझी माझी....
भेट तुझी माझी....
*भेट तुझी माझी*
💞💞💞💞💞💞💞💞
भेट तुझी अन माझी जणू माझ्या
आयुष्यातील तो अविस्मरनीय प्रसंग,
तुला बघताच त्याक्षणी सखे
झालो होतो ग मी दंग.....
एकटक बघावेसे वाटत होते
तू मला भेटल्यावर,
तुझ्या गालावरील सुंदर खळी
उमटून दिसे तू हसल्यावर....
तू बोलतांना तुझ्या लाल
डाळिंबी ओठांनी स्तब्ध मला केले.
तुझ्या नेत्रकटाक्षाने जणू माझ्या
नाजुक हृदयात गलबला केले....
तुझ्या अंगकाती वर जणू
नक्षत्र विसावलेत,
तू बाहूपाश्यात येताच माझ्या
वाटे जणू संपूर्ण विश्व समावलेत...
जसं तुझ्या नावात दीप
तशी ज्योत प्रज्वलित केलीस माझ्या जीवनात,
मात्र भेटीची मिठी मारून
घर करून अंतकरणात गेलीस ..
पहिली वहिली भेट तुझी माझी
देईल आपल्या प्रेमाची ग्वाही,
माझं तर असं झालयं राणी
*हम है आपके प्यार के राही*...

