प्रतिभावंत बाप
प्रतिभावंत बाप
त्याच्या प्रतिभेचा स्पर्श झाला
माझ्या चिमुकल्या जीवाला,
ज्यानं स्वत:च्या जीवाचे रान
करून वाढवले मला...
त्याच्या प्रतिभेच्या सावलीने
पोहोचलो मी या स्थानावर,
त्याच्या सुंदर संस्कारांनी
घर केले माझ्या मनावर...
त्याच्या प्रतिभेच्या परीसस्पर्शाने
माझी नाळ जुडली साहित्याशी,
जे कधी न घडले असते
माझ्या या बुद्धिशी...
माझ्या प्रत्येक यशामागे आहे
त्याच्या प्रतिभेचा मोलाचा वाटा,
त्याच्या त्या संस्काराने मी केला
जीवनात चांगल्या गुणांचा साठा...
माझ्या जीवनाचा पहिला
मार्गदर्शक, पहिला ठरला तो गुरू,
व त्याच्यानेच माझ्या जीवनाच्या
प्रगतीची वाटचाल झाली सुरु...
त्याच्या जीवनातील प्रत्येक
कष्टाची पाहणी केली मी,
मला घडवण्यामागे खरंच
त्याची प्रतिभा आहे ती...
माझ्या प्रत्येक यशानंतर
त्याची असते कौतुकाची थाप,
दुसरा, तिसरा तो कुणी नसून
तो आहे माझा प्रतिभावंत बाप...
