व्याकुळ मन
व्याकुळ मन
पहिल्या प्रेमाच्या सहवासाची
आठवण करते मनाला व्याकुळ,
माझ्या हातात असताना तिचा हात
अस वाटयचं हेच माझ गोकुळ...
बेभान व्हायच हे वेड मन जेव्हा
भिडायच्या तिच्या नजरेशी नजरा,
वाटायच जनू हा निसर्ग करतो
आमच्या प्रेमाला मुजरा...
बेभान झालेल्या मनाला तिने
क्षणोक्षणी सावरलं,
तिची साथ जशी हृदयाने हृदयाला
दिलेली जशी हळूच चाहुलं....
प्रेम तर नजरेचा खेळ असतो
ते कधी कळून होत नसतं,
प्रत्येकाला मिळत नाही खर
प्रेम हीच वाटते खंत....
तहानलेल्याला अमृत वाटे जस पाणी
प्रेम तीच जनू उन्हामध्ये सावली,
माझ्यासाठी तशीच ती म्हणून तर
पहिल्या नजरेत मला भारावली..
स्वप्नात सुद्धा तीच असायची मनात
विचार सुद्धा तिचेच फिरकायचे,
वाटलं नव्हत पण कधी पहिल
प्रेम एका क्षणात दूर जायचे...
पहिल प्रेम आयुष्यभर टिकवायला
नशीबच लागतं,
नात्यामध्ये भावनांना पोहचायला
प्रेम सुद्धा खर लागतं...
म्हणून पहिल प्रेम मिळवायला
मन व्याकुळ होतं...
